भैरवनाथ मंदिर वरूड

                               वरूड मधील मंदिरे
भैरवनाथ मंदिर वरूड
              भैरवनाथ मंदिर वरूड गावातील प्रमुख मंदिर आहे. भैरवनाथ हा देव वरूडचे ग्रामदैवत असून त्यास गाव चा रक्षणकर्ता मानले  जाते.मंदिराच्या गाभाऱ्यात श्री भैरवनाथाच्या मूर्ती बरोबरच देवीची मूर्ती पाहावयास मिळते .मंदिराचा जीर्णोद्धार सन         रोजी करण्यात  आला.  या भागातील र्जीर्णोद्धारात ग्रामस्थांनी हातभार लावला. भैरवनाथ मंदिराची स्थापना ७०ते ८० वर्षांपूर्वी करण्यात आली.
               हे मंदिर वरूड गावचा ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम करत आहे.  यात्रा माघ   पौर्णिमेला[साधारणतः  फेब्रुवारी महिन्यात] भरते .ही यात्रा आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते.मंदिराचे बांधकाम अतिशय सुबक व नक्षीदार असून मंदिराचे शिखर दूरवरुन लक्ष वेधुन घेते.दररोज संध्याकाळी आरती होते .  दर रविवारी आणि पौर्णिमा अमावस्येच्या वेळी भाविकांची दर्शनासाठी  गर्दी होते .
   "" श्री भैरवनाथ प्रसन्न ""
भैरवनाथाच्या नावाने चांगभलं! !!!!!!!!

No comments:

Post a Comment